बंद

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

    !! आपली सेवा आमचे कर्तव्य !!



    महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

    वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

    पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.

    महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र

    लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी

    मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण – लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत अधिसूचित सेवांची यादी
    सेवेचे नाव आवश्यक शुल्क (लागू असल्यास) सेवा देण्याचा कालावधी (दिवस)
    भाडे-परिपत्रक क्र. 45 अन्वये सहकार विभागाच्या अहवाला नुसार झोपडीधारकांच्या बँक खात्यावर भाडे प्रदान तपशीलाच्या प्रमाणीत प्रती देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    ना- हरकत (एन.ओ.सी) परिपत्रक क्र. 3 अंतर्गत प्राप्त प्रस्तावाच्या अनुषगांने निर्गमित केलेल्या ना-हरकत (NOC) प्रमाणपत्राच्या प्रमाणित प्रती देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.3 अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियम क्र. 14.7 अंतर्गत प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या परिशिष्ट-VI च्या प्रमाणित प्रती देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र.3 अन्वये एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियम क्र. 14.7.16 अंतर्गत प्राप्त प्रस्तावांच्या अनुषंगाने निर्गमित केलेल्या परिशिष्ट-VI च्या प्रमाणित प्रती देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम 1971 चे कलम 14(1) अन्वये प्राप्त भूसंपादन प्रस्तावांच्या अनुषंगाने नगर रचना विभागाने निर्गमित केलेले अभिप्रायांचे प्रमाणित प्रती देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र. 3 अन्वये निर्गमित केलेल्या ना हरकत प्रमाणपत्राची प्रमाणित प्रत देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील परिपत्रक क्र. 3 ब अन्वये विकासकाने सादर केलेल्या GIS सिडीची प्रत उपलब्ध करून देणे प्रति सिडी रु.50/- 15
    झोपडीधारकांच्या घर भाडे बाबतच्या तक्रारी निकाली काढणे निरंक 30
    झोपडीधारकांना सदनिकांच्या वाटपाची सोडत काढणे निरंक 30
    भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर 5 वर्षांनी सदनिका हस्तांतरण विषयक सेवा अर्जावर सुनावणी घेवून हस्तांतरणास परवानगी देणे 50,000/- 30
    झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील सहरकारी गृहनिर्मााण संस्थांची नोंदणी करणे 2,500/- 60
    परिशिष्ट -2 मधील पात्र झोपडपट्टीधारक मयत झाल्यानंतर त्यांचे सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदत्व व सदनिकेचे हस्तांतरणाबाबत कार्यवाही करणे. निरंक 60
    पी.ए.पी. सदनिका वाटपाबाबतच्या आदेशाची प्रमाणीत प्रत देणेबाबत. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    परिपत्रक क्र. 3 व 3 अ अनुसार देण्यात आलेल्यांना हरकत प्रत्राची प्रमाणित प्रत देणे प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    परिशिष्ट – II ची अर्जदारापुरती प्रमाणित प्रत देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    शासन निर्णय क्र. झोपुधो 1001/प्र.क्र. 125/14/झोपसु-1 दिनांक 16/05/2015 नुसार अपात्र झोपडीधारकांनी सादर केलेल्या जोडपत्र 3 व जोडपत्र 4 वर निर्णय घेणे केवळ हस्तांतरण प्रकरणांमध्ये निवासी रु. 40,000/-, अनिवासी रु. 60,000/- 90
    शासन निर्णय क्र. झोपुधो 0810/ प्र.क्र.96/2018 झोपसु-1 दिनांक 16/05/2018 नुसार सशुल्क पुनर्वसनाकरिता झोपडीधाकांनी सादर केलेल्या जोडपत्र 3 व जोडपत्र 4 वर निर्णय घेणे 1) सशुल्क पुनर्वसन योग्य झोपडीचे रु. 2,50,000/-. 2) सशुल्क पुनर्वसन योग्य झोपडीचे हस्तांतरण शुल्क 40,000/- रूपये. 90
    परिशिष्ट 2 मधील पात्र झोपडपट्टीधारक मयत झाल्यास वारस नोंदणीबाबत प्राप्त अर्जावर निर्णय घेणे निरंक 60
    झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित (3C) प्रस्तावाबाबत निर्णयाची प्रमाणित प्रत देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15
    सुविधा (Amenities) बालवाडी, सोसायटी ऑफिस यांचा ताबा देणे. निरंक 30
    मंजूर बांधकाम आराखडयातील बदल करणे बांधकाम क्षेत्र X रु.5/- प्रति चौ.मी. 30
    भोगवटा प्रमाण पत्राची प्रत /मंजूर नकाशांच्या प्रमाणित प्रती देणे. प्रमाणीत प्रत प्रति रु.26/- 15