झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या माहितीकरिता प्राधिकरणामार्फत विशेष उपक्रम
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री.संदीप माळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २९/०९/२०२५ रोजी योजनेतील नागरिकांना प्राधिकरणाबाबत विविध विषयांवर माहिती देण्याकरिता विशेष उपक्रम राबविण्यात आला होता. सदर उपक्रमात पात्रतेबाबत, वारस नोंदणीबाबत, रखलेल्या योजनेमध्ये अभय योजना राबविण्याबाबत इ. अशा अनेक विषयांसंदर्भात नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले असून, नागरिकांच्या झो.पु.योजनेबाबतच्या अनेक शंकांचे देखील निरसन करण्यात आले. सदर उपक्रमास प्राधिकरणातर्फे श्रीम. मिनल पालांडे (सक्षम प्राधिकारी-४) व इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सर्व नागरिकांच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमस्थळी दिवसभरात मोठया संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून योजनेतील विविध विषयांची माहिती घेऊन आपल्या शंकाचे निरसण केले तसेच अशा नाविण्यपूर्ण संकल्पनेबाबत प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (श्री.माळवी), सक्षम प्राधिकारी-4 (श्रीम.पालांडे) व इतर उपस्थित सर्व अधिकारी/कर्मचारी वर्गाचे आभार मानले. तसेच शासनाच्या विभागाने लोकांच्या दारी जाऊन त्यांचे प्रश्न सोडविल्यामुळे सर्व नागरिकांनी प्राधिकरणाने केलेल्या या यशस्वी उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.