महाराष्ट्र दिन २०२६
महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास व समृद्ध परंपरा जपणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी – मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने “महाराष्ट्र दिन “उत्साहात साजरा
मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे यांच्यावतीने “महाराष्ट्र दिन “उत्साहात साजरा
ठाणे : संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती ही अनेकांच्या त्याग, कष्ट आणि चळवळींमधून उभारलेल्या लढ्याचे फलित आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास व समृद्ध परंपरा जपणे ही प्रत्येक कर्मचाऱ्यांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, ठाणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांनी केले.
१ मे रोजी राज्यभर महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, प्राधिकरणाच्या वतीनेही महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच प्राधिकरण परिसरात देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी संदीप माळवी म्हणाले की, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करताना महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यातील प्रत्येकाचे योगदान आपण स्मरणात ठेवले पाहिजे. त्या प्रेरणेने उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रत्येकाने जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे कार्य केले पाहिजे.
या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांच्यासह सचिव कल्पना जगताप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा(1 MB)