बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या:

    • मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील झोपडपट्टी क्षेत्रासंबंधीच्या विद्यमान स्थितीचे सर्वेक्षण करणे व आढावा घेणे.
    • झोपडपट्टी क्षेत्रांच्या पुनर्वसनाकरिता योजना तयार करणे.
    • झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची अंमलबजावणी करवून घेणे
    • झोपडपट्टयांच्या पुनर्वसनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असतील अशा इतर सर्व कृती व गोष्टी करणे

    एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली:

    शासनाने राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नियोजन प्राधिकरणे/विशेष नियोजन प्राधिकरणे/ विकास प्राधिकरणे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नैना जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, हिल स्टेशन, नगरपालिका, पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसूचित केलेली संवेदनशील क्षेत्रे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, मिहान, एमएडीसी, एमएमआरडीसी ही नियोजन प्राधिकरणे वगळता उर्वरित सर्व नियोजन प्राधिकरणे व प्रादेशिक योजना क्षेत्रांकरिता एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (UDCPR – 2020) ही शासन अधिसूचना क्र.टिपीएस-1818/प्र.क्र. 236/18/वियो. व प्रायो./कलम 37 (1कक) (ग) व कलम 20(4) /नवि-13, दिनांक 02 डिसेंबर, 2020 अन्वये लागू केली असून, त्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना मंजूरीकरिता विनियम क्र. 14.7 प्रमाणे तरदूत करण्यात आली आहे.